Posts

Showing posts from May, 2020

दि कोरोना इफेक्ट 📈

Image
कोरोना हा शब्द गेले दिड महिना सतत दिवस आणि रात्र आपल्या कानावर पडत आहे कुठे ही जा , टी. व्ही लावा एवढेच काय तर टीव्ही वरील जाहिराती त हि कोरोना आहेच या कोरोना ने अक्षरशः वैताग आणला आहे. एक असा रोग की ज्याने संपुर्ण जगात थैमान घातले आहे, संपुर्ण जग हे लॉक झाले आहे. भारतामध्ये २२ मार्च ला संपूर्ण लॉकडाउन करण्यात आला. आणि त्यादिवसापासून आजचा ४७ वा दिवस आहे आपण घरात आहे आणि हे अजून १७ मे पर्यंत चालणार आहे.आणि तिथून पुढे ते तसेच राहील किंवा निघेल हे सरकारच तेव्हाची परिस्थिती ची पडताळणी करून ठरवेल. तोपर्यंत आपण घरातच राहिलेले चांगले. ◽ को रोनाची पार्श्वभूमी :-                              आपल्या सर्वांना माहीतच आहे की कोरोना चा पहिला रुग्ण हा चीन मधील वूहान शहरामध्ये 2019  च्या डिसेंबर  मध्यात सापडला आणि वूहान च्या मीट मार्केट मधूनच याचा प्रसार जगभर झाला. तेव्हापासून सर्व देश आणि खासकरून अमेरिका चे लक्ष चीन वर आहे. तसा चीन हा संशयाच्या दायऱ्यात आहेच कारण चीन ने या virus बद्दल ची माहिती जगापासून लपवली आणि लवकर त्यावर प्रतिबंध देखील नाही केला आणि यामुळेच अमेरिकेचे