दि कोरोना इफेक्ट 📈
कोरोना हा शब्द गेले दिड महिना सतत दिवस आणि रात्र आपल्या कानावर पडत आहे कुठे ही जा , टी. व्ही लावा एवढेच काय तर टीव्ही वरील जाहिराती त हि कोरोना आहेच या कोरोना ने अक्षरशः वैताग आणला आहे.
एक असा रोग की ज्याने संपुर्ण जगात थैमान घातले आहे, संपुर्ण जग हे लॉक झाले आहे. भारतामध्ये २२ मार्च ला संपूर्ण लॉकडाउन करण्यात आला. आणि त्यादिवसापासून आजचा ४७ वा दिवस आहे आपण घरात आहे आणि हे अजून १७ मे पर्यंत चालणार आहे.आणि तिथून पुढे ते तसेच राहील किंवा निघेल हे सरकारच तेव्हाची परिस्थिती ची पडताळणी करून ठरवेल. तोपर्यंत आपण घरातच राहिलेले चांगले.
◽ कोरोनाची पार्श्वभूमी :-
आपल्या सर्वांना माहीतच आहे की
कोरोना चा पहिला रुग्ण हा चीन मधील वूहान शहरामध्ये 2019 च्या डिसेंबर मध्यात सापडला आणि वूहान च्या मीट मार्केट मधूनच याचा प्रसार जगभर झाला. तेव्हापासून सर्व देश आणि खासकरून अमेरिका चे लक्ष चीन वर आहे. तसा चीन हा संशयाच्या दायऱ्यात आहेच कारण चीन ने या virus बद्दल ची माहिती जगापासून लपवली आणि लवकर त्यावर प्रतिबंध देखील नाही केला आणि यामुळेच अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष ट्रम्प हे या virus ला chines virus असे म्हणतात. पण सुधारेल तो चीन कसला; चीन ने तो virus वटवाघळातुन (BAT) आला असे म्हणून आपली जबाबदारी झिडकारली.
आपल्याला जो साधा सर्दी , खोकला येतो तो देखील एक प्रकारचा कोरोना virus च आहे ....पण ....पण ....तो एक साधा कोरोना आहे. आणि आत्ताच जो आहे तो ‛नोवेल-कोरोना’ आहे; ज्याला परत World Health Organization (WHO) ने ‛ कोव्हिड-19’ (Covid-19) हे नाव दिले.
_________________________________________
आपल्याला याची लक्षणे काय आहेत , तो कसा पसरतो
आणि त्यापासून बचावाचे पर्याय काय हे सांगण्याची काही गरज नाही कारण दीड महिना तेच ते ऐकून एकूण विट आला आहे. आपण या ब्लॉग मधे हि Boring माहिती सोडून थोडी नवी माहिती पाहणार आहोत . चला तर मग काय आहे ती बघू 👉
कोरोना हा जवळ जवळ जगातील सर्वच म्हणजे 170+ देशांमध्ये पोहचला आहे. आणि त्या सर्व देशांच्या डोक्याला ताप करून ठेवला आहे. अस कधीच झालं नाही की सर्व जग हे एकाच प्रॉब्लेम ने हैराण झाले आहे आणि त्याचा सामना करत आहे पण कोरोना च्या माध्यमातून 2020 या वर्षात हे देखील शक्य झाले आहे.
◽टॉप 10 कोरोना बाधित देश :-
Sr.No देशाचे नाव एकूण रुग्ण (+) मृत्यू (+)
1) अमेरिका 13,47,309 80,037
2) स्पेन 2,62,783 26,478
3) इटली 2,18,268 30,395
4) ब्रिटन 2,15,260 31,587
5) रशिया 1,98,676 1827
6) फ्रान्स 1,76,658 26,310
7) जर्मनी 1,71,324 7549
8) ब्राझील 1,56,061 10,656
9) तुर्की 1,37,115 3739
10) इराण 1,06,220 6589
* चीन 82,901 4633
* भारत 62,939+ 2109+
_________(Source = worldometer.com)
__________________________________________
◽कोरोना चा प्रादुर्भाव नसलेले देश :-
1) किरीबती (Kiribati)
2) लेसोथो (Lesotho)
3) मार्शल आयलंड ( Marshal Island)
4) मायक्रोनेशिया (Micronesia)
5) नऊरु (Nauru)
6) उत्तर कोरिया (North-Coria)
7) पलाऊ (Palau)
8) सामोआ (Samoa)
9) सोलोमोन आयलंड (Solomon Island)
10) टोंगा (Tonga)
11) तुर्कमेनिस्तान (Turkmenistan)
12) टुवालु ( Tuvalu)
13) वण्यातू ( Vanuatu)
तर हे कधीही न ऐकलेले असे विक्षिप्त देश आहेत या देशांमध्ये कोरोना पसरला नाही कारण वरीलपैकी बहुतांशु देशांच्या सिमा या कोणत्या ही देशाला लागून नाहीत आणि सर्वात महत्वाचे म्हणजे या देशात कोणीही पर्यटक किंवा लोकांची ये-जा नसते आणि या देशांकडे जाणारी विमानसेवा ही अत्यंत कमी आहे.
____________(Source = Al Jazeera News)
__________________________________________
✴ तर हे झाले विदेशातील कोरोना ची स्थिती
आता भारतातील राज्यांची काय परिस्थिती आहे ते पाहूया. 👉
◽टॉप 10 कोरोना बाधित राज्ये :-
Sr.No. राज्याचे नाव एकूण रुग्ण (+)
1) महाराष्ट्र 19,063
2) गुजरात 7,402
3) दिल्ली 6,318
4) तामिळनाडू 6009
5) राजस्थान 3,579
6) मध्यप्रदेश 3,341
7) उत्तरप्रदेश 3,214
8) आंध्रप्रदेश 1,887
9) पश्चिम बंगाल 1,678
10) पंजाब 1,371
_____________(Source = My Gov.com)
__________________________________________
◽टॉप 10 सर्वात कमी कोरोनाबधित राज्ये :-
Sr.No. राज्याचे नाव एकूण रुग्ण (+)
1) झारखंड 132
2) त्रिपुरा 118
3) उत्तराखंड 63
4) आसाम 59
5) छत्तीसगड 59
6) हिमाचल प्रदेश 50
7) मेघालय 12
8) गोवा 7
9) मणिपूर 2
10) अरुणाचल प्रदेश 1
मिझोराम 1
_______________(Source = My Gov.com)
__________________________________________
आता आपल्या राज्यातील अंतर्गत स्थिती काशी आहे ते पाहूया 👉
“ महाराष्ट्रामध्ये सध्या कोरोनाच्या एकूण = 19063+ केसेस आहेत. आतापर्यंत एकूण = 3470+ जणांना डिस्चार्जे देखील मिळाला आहे. आणि एकूण 779+ मृत्यू झाले आहेत. ”
◽टॉप -10 कोरोनाबधित जिल्हे (म.न.पा) :-
Sr.No. जिल्हा/म.न.पा एकूण रुग्ण मृत्यू
1) मुंबई मनपा 12,864 489
2) ठाणे मनपा 800 8
3) नवी मुंबई 789 4
4) मालेगाव 472 20
5) कल्याण-डोंबिवली 316 3
6) वसई - विरार 216 9
7) मीरा - भाईंदर 201 2
8) पनवेल 137 2
9) रायगड 89 1
10) नाशिक 50 0
________(Source = Maharashtra Gov.com)
__________________________________________
✳ महाराष्ट्र सरकारने संपूर्ण राज्याची विभागणी ही एकूण चार (4) झोन मध्ये केली आहे आणि त्या - त्या झोन प्रमाणे सरकारने त्या ठीकानी काही प्रामनत सवलती/ शिथिलता ही दिलेली आहे.
चला तर मग पाहू कोणता जिल्हा कोणत्या झोन मध्ये आहे ते
1) कंटेन्मेंट झोन - मुंबई , ठाणे , पुुणे , नाशिक , मलेगाव.
( या झोन मध्ये कोणत्याही प्रकारची सवलत नाही सर्वात धोकादायक झोन. )
2) रेड झोन (Red Zone) :-
पालघर , नागपूर , सोलापूर , यवतमाळ ,
औरंगाबाद , सातारा , धुळे , अकोला , जळगाव.
(कोणतीही सवलत नाही )
3) ऑरेंज झोन ( Orange Zone) :-
रायगड , अहमदनगर , अमरावती , बुलढाणा , नंदुरबार , कोल्हापूूूर , हिंगोलीी,
रत्नागिरी , जालना , नांदेड , चंद्रपूर , परभणी , सांगली , लातूर , भंडारा , बीड .
( मोठ्या प्रमाणात सवलत , जवळ- जवळ पूर्वरत)
4) ग्रीन झोन (Green Zone) :-
उस्मानाबाद , वाशीम , गोोंदििया , वर्धा , गडचिरोली , सिधुदुर्ग.
(सर्व काही सुरळीत सुरू , कोणताही धोका नाही)
तर अशा प्रकारे एकूण महाराष्ट्राची स्थिती आहे.
_______________(Source = Sakal Times)
__________________________________________
✴ चला तर आपण या ब्लॉग च्या शेवट च्या टप्यात आलो आहोत. तर आपण या कोरोनामुळे जो लॉकडाउन केलेला आहे त्याचे फायदे काय झाले आणि तोटे कोणते ते पाहूया. 👉
◽ लॉकडाउन चे फायदे :-
1) पर्यावरण संतुलित झाले
2) नद्या नाले संपूर्ण स्वच्छ झाले :-
ज्या गंगा नदीचे बजेट वीस हजार करोड (20,000 CR ) होते आणि तरीही गंगा आहे तशीच प्रदूषित होती तीच नदी लॉकडाउन च्या एकाच महिन्यात संपूर्णपणे स्वच्छ झाली. नदीमध्ये मासे , बदक आणि इतर जलचर प्राण्यांची संख्या वाढली.
3) हवेचे प्रदूषण थांबले :-
सर्व फॅक्टरी , कंपनी , वाहतूक बंद असल्याने हवेत विषारी वायू मिसळले नाहीत. आकाश निळे भोर दिसते , पक्ष्यांची सैर ही खूप वाढली , रात्री मोठया प्रमाणात चांदणे पहावयास मिळते.
4) नात्यांतील गोडवा वाढला :-
लॉकडाउन मुले सर्व उद्योग बँड आहेत त्यामुळे सर्व लोक घरातच असल्याने चर्चा , हास्यविनोद वाढले.
5) लोक आपली passion आवड जोपासली
6) प्राण्यांचा मुक्त विहार वाढला.
__________________________________________
◽कोरोनामुळे झालेले नुकसान :-
1) आर्थिकमंदी ( GDP त घट)
2) शेतकऱ्याचे नुकसान , शेतमाल शेतातच.
3) अनेक मजूर रस्त्यावर ,आपापल्या घरी रवाना
4) 62,000 कोरोना केसेस , 2109+ मृत्यू
5) अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या , उद्योग ठप्प
6) राज्यातील शेवटच्या वर्षाच्या सोडून इतर सर्व वर्षाच्या परीक्षा रद्द.
7) वाहतूक , विमानसेवा ठप्प.
“ या कसोटीच्या घडीत देखील डॉक्टर्स ,नर्सेस ,पोलीस ,लष्कर , सफाई कर्मचारी आणि काही NGO स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना शी लढा देत आहेत अनेकांचे प्राण वाचवत आहेत त्यांचे जेवढे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. 🇮🇳🇮🇳
त्यामुळे घरी रहा सुरक्षित रहा.
( Stay Home Stay Safe)
धन्यवाद
🙏
श्रीराम जोशी
Nice
ReplyDeleteThank you 🙏😊
DeleteGreat
ReplyDeleteThank you so much 😊🙏🙏
DeleteThank you 🙏
ReplyDelete